Sunday, December 27, 2009

एक खंत

एक खंत
--------------------------------------------------------------------------------

कधी कधी असंच एकांतात बसलं तर ...

'मन अचानक मागच्या आठवणीत हरवु लागतं,

वर्तमानातल्या विचारांची तंद्री तूटते,

आणि ते भूतकाळातच रमू लागते'.

ते दिवस आठवले की 'त्या क्षणांपुरत' तरी मन खऱ्या अर्थाने खूष होतं, आणि नाजुकशी हास्याची झुळूक ओठांवर तरळून जाते ... ते ओठ ज्यांनी वर्तमानातल्या खस्ता खावून स्वत:ला आजवर संकुचित ठेवलं होतं.

ते दिवस खरंच काही औरच होते! 'शाळेतले ते दिवस' ज्या दिवसात आयुष्य फक्त एका विशिष्ट टप्प्यापुरतच स्तिमित होतं. 'घर - अभ्यास, असतील नसतील तितका मित्र - परिवार (मग तो आपल्या पुरताच भले मोजकाच का असेना) ... आणि आपण. हेच ते टप्पे. यातच सर्व आयुष्य बांधलं गेलेलं असायचं, सर्व विश्वं सामावलेलं असायचं. शाळेचे दिवस आठवले की, आठवतो तो हर एक दिवस... 'ते पहाटेचं सकाळी लवकर उठून भरा-भर तयारीला लागणं, पहाटेच्या त्या प्रसन्न वातावरणात मन काही वेगळीच प्रसन्नता अनुभवायचं.

सकाळ - सकाळ आंघोळ, चहा-पाणी, नाश्ता आटपून भर-भर पावलं शाळेच्या दिशेने चालायला लागायची; त्यातही जर मौसम थंडीचा असेल तर शाळेत जायची मजा नाम-निराळीच! त्या कडाक्याच्या थंडीतही स्वेटर कधी मला आठवतंच नाही मी घातलेलं, सकाळ - सकाळ त्या बोचऱ्या थंडीत कडकडून आणि दात वाजवत - वाजवत, दोन हातांची घट्ट घडी घालून (इतपत की केवळ तेवढीच काय ती उब), पावलांना भर-भर ओढायचे शाळेच्या वाटेने ... खूप वेगळाच अनुभव होता तो ... त्यातही शाळेत पोहोचताच राष्ट्रगीताचा पहिला-वहिला मान, अंगाला गुलाबी थंडी बोचत असतानाही ते स्तब्ध उभे राहण्याचे तत्व सर्वांना पाळायलाच लागते, मग 'या कुंदे तुषार हार, धवला ...' अशी सरस्वतीची प्रार्थना करून सुरु व्हायचा शाळेचा हर एक नविन दिवस.

शाळेच्या दिवसांमध्ये निदान माझ्या बाबतीत तरी अभ्यासात इतका seriousness होता, इतकं अभ्यासाने झपाटलेलं होतं कि बास! आजही माझा शाळेतला अभ्यास आठवला की विश्वासच बसत नाही की मी खरंच! अभ्यास इतका केला होता का? कारण आजची, म्हणजे आताची कॉलेज life ची अभ्यासाची परिस्थिती विचाराल तर मला स्वत:ला लाज वाटेल (प्रामाणिकपणे) इतपत बेकार आहे. म्हणूनच त्या दिवसाचं खूपच आश्चर्य वाटतं. हो! पण या गोष्टीला एक कारण नक्कीच जबाबदार आहे. ते म्हणजे 'त्या' आणि 'या' वेळचं आमचं 'विश्वं'! होय ...

असं यापूर्वी सांगितलं; त्यावेळचं आमचं (माझं) विश्व फक्त आणि फक्त घर - अभ्यास - शाळा इतपतच सामावलेलं पण ... आज तेच विश्व बऱ्याच टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. जसं ... 'माझं घर, माझा मित्र - परिवार (अर्थातच मोठा) कारण कितीही म्हटलं तरी कॉलेज life ही शेवटी अधुरीच त्याच्या शिवाय म्हणून; मग आमचा इतर extra activities म्हणजे मित्र - परिवार मोठा मग activities नकोत का वाढायला? उदा. नव-नविन ठिकाणी मित्र - मैत्रिणीसोबत हिंडायला जाणे, त्यांच्या मस्तीत स्वत:ला हरवणे, याची त्याची टेर खेचणे, मौज मजा करणं, आणि बरंच काही ... माझ्या शब्दांत ती मजा मावणार नाही ... त्यानंतर माझ्या सारख्यांचा जॉब (side by side) आणि त्यानंतर शेवटी राहिला तो फक्त 'अभ्यास'. तो ही seriousally तर बिलकूल न केलेला (rather कॉलेज life मध्ये करावासाही न वाटलेला) असं हे आमचं कॉलेज विश्वं दुभागलेलं, विभागलेलं अगदीच म्हणाल तर अफाट विस्फारलेल ... असो ...

मग शाळेतील अभ्यासाचा, त्या मार्क्सचा कॉलेजे मधील अभ्यास आणि मार्क्सशी काही मेळ साधेल का? नक्कीच नाही! कारण शाळेतली अभ्यासाची प्रगती म्हणजे उत्तम न्हवे अति - उत्तम! (निदान माझ्या बाबतीत तरी). त्या शाळेच्या दिवसात तर स्पर्धा लागायच्या, compititions चालायची मित्र -मैत्रिणीसोबत अभ्यासाला घेऊन. कुणाचे मार्क्स किती चांगले असतील, कुणी किती मार्क्सने पुढे जातील? यात तर अक्षरक्ष: जीवतोड स्पर्धा लागायची, त्यातल्या त्या स्पर्धेतच जेव्हा विजयी व्हायचो ना बास! असे वाटायचे जिंकले सर्व काही ... तो आनंद अवर्णनीयच!

पण ... आजची अभ्यासाची प्रगती? ... प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर .... आमचा अभ्यासच मुळात पेपरच्या एक दिवसापूर्वी सुरु होतो कॉलेज कुमार - कुमारीकांनाच माझे म्हणणे शब्दश: पटेल कारण शेवटी same experience चे बोल दुसरे काय! मग असा हा अभ्यास परीक्षेच्या एका दिवसापूर्वी सुरु केलेला मग कसल्या competitions आणि कसल्या स्पर्धा? त्यातही वेळ आमचा पेपरच्या अखेरच्या दिवसांपर्यंत notes शोधण्यातच जातो. मग वाचणं, अभ्यास करणं, ते शाळेत करायचो तसं घोकंपट्टी करणं तर दूरच ... tension मुले जे वाचायचो ते ही नुसतंच डोक्यावरून जायचं ... मग काय मार्क्स मिळणार? शाळेप्रमाणे 'तुझे जास्त का माझे कमी' हा वाद सोडाच पण passing पुरते भेटले तरी बास! tention नाही.

अशी आमची अवस्था ... नव्हे दुरावस्था! अशी ही अभ्यासाची प्रगती ... खरंच किती जमीन अस्मानाचा फरक आहे school life आणि college life मध्ये हे अश्या वेळी जाणवायला लागतं ...

शेवटी college life लाही दोष देऊन उपयोग नाही कारण कुणीतरी सांगून ठेवलंय ... "colleage चे दिवस हे सोनेरी दिवस असतात!" मग आम्ही या सोनेरी दिवसातलं सोनं भर-भरून जगलो तर काय हरकत आहे?

school life, college life याचं comparision खरंच जर मी छोटया छोटया मुद्यांवरून करायचं म्हटलं तर ते अशक्यच ... पण सर्वात मुख्य म्हणजे shcool life मध्ये असताना जे आयुष्य अंगवळणी पडलं होतं ते खरंच आज कुठेतरी हरवलंय, जे हवं-हवंस वाटतंय ... कारण त्यावेळी आयुष्यच किती क्षुल्लक आणि लहानगं वाटायचं, त्यावेळी संकटं म्हणजे परीक्षा वाटायची आणि कमी-जास्त मार्क्स किंवा नापास होणं म्हणजे आयुष्यातील चढ-उतार! आज हे आठवतं तेव्हा स्वत:चेच स्वत:ला हसु येते ... आणि मन ही त्यावेळी किती संकुचित असायचे नाती, नात्यातील बंध, विश्वास, प्रेम, विश्वासघात, मन दुखावणं हे प्रकार, या गोष्टी मनाला कधी त्या काळात स्पर्शल्या ही नाहीत ... कारण त्यावेळी केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सामावलेलं विश्व! म्हणूनच त्या विश्वाचा ... त्या आयुष्याचा आज हेवा वाटतो ... खऱ्या अर्थाने हेवा वाटतो ...

कारण आज जीवनाच्या या टप्प्यावर समजु लागलंय काय असतं आयुष्य ते ... आयुष्यातील चढ उतार काय असतात, संकट काय असतात ... म्हणूनच हे आयुष्य नकोसं वाटतं ... आणि हेवा वाटतो तो "त्या आयुष्याचा' 'भूतकाळात' हरवलेलं ते आयुष्य आठवतं खरंच किती सुखद होतं! ... पण ... आज ... आपण ते जगायचंय म्हणतानाही जगू शकत नाही ... कधी जगता येणारही नाही ... हिच एक खंत राहते ... एक खंत टोचते ... बास हीच एक खंत ... तेवढीच एक खंत!

                                                                               - निर्मला बोरकर.

Friday, December 25, 2009

पहिल्या अधूर्या भेटी सारखे

हल्ली मी
कविता लिहायला तर घेते
पण... .त्या अधुर्याच राहतात
आपल्या पहिल्या अधूर्या भेटी सारख्या

लिहायचे तर असते भरपूर कही
पण.भावनाच फ़क्त दाटून येतात
आणि लिहिणे मात्र अधूरे राहते
अगदी आपल्या पहिल्या भेटी सारखे

हे आता असच होत राहीन
तुझ्या भेटितले अधूरेपन
सतत सतवत राहिल
आणि..........कविता माझ्या
अशाच अधूर्या "अर्थपूर्ण"
आपल्या पहिल्या अधूर्या भेटी सारख्या.............

निर्मला........

तो ही आयुष्यात असाच आला

तो ही आयुष्यात असाच आला
इतरांप्रमाने सहज
पण..........मनात छाप ठेउन गेला आपली
कधीही मला न विसरता येइल इतपत.

गुंतत चालली आहे मी त्याच्यात
मन-अखंड भावनानी
समजेल का त्याला कधी....
जरी मी नाही कधी व्यक्त करू शकले
शब्दानी?????

आठ्वानिंची त्याच्या आता
या मनाला ही खुप सवय लागली आहे
त्याच्या विचारंचीच जत्रा
हल्ली मानत भरू लागली आहे

 त्याच्या  हसण्यात, त्याच्या बोलण्यात
मी हरवून बसते स्वताला
भानही राहत नहीं माझे
कसे सावरू आता या मनाला

त्याचाच भास, त्याच्यीच आस
सारखी लगते या मनी
अश्रु येतात दातुन नयनी
"तो कधी समजणार नाही"
असे पटते ज्या क्षणी..............



                                    निर्मला.

Friday, December 18, 2009

तू आणि तुझं सर्व विश्व..............

तू आणि तुझं सर्व विश्व..............
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती


                                    निर्मला..............

Thursday, December 17, 2009

माझ्या चारोळ्या

माझ्या चारोळ्या

माझ्या मनातील दुखद भावना
             फक्त तुझ्याच साठी आहेत
तुझा सहवास संपवताना
            ते तुला अखेरचा निरोप देत आहेत..........
*****************************************

तुझी सोबत , तुझी संगत
               आयुष्य भर असावी
नाही विसरणार मैत्री तुझी
           तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी

*****************************************
तुला मला खरच खूप
               जवळून पहायचं
 तुझ्या मनातील कोडंही
               मला सहजपणे सोडवायचे......

*****************************************
काही तरी कमी आहे आयुष्यात

                असे सारखे वाटते,
जाणीव  तू जवळ नसल्याची
               क्षण - क्षणाला मनी दाटते.

***************************************

आज तू असतास तर
                  बाहुत तुझ्या विसरले असते मी या जगाला,
निपचित पडून मिठीत तुझ्या.
                   भुलले असते माझ्या अस्तित्वाला.

*****************************************



                                                                         निर्मला ........

अशीही एक रात्र यावी

अशीही एक रात्र यावी
सोबत तुझ्या जी विरून जावी
चांदण्यांच्या विश्वात रमताना
साथ तुझी मला निरंतर मिळावी........

एकाच त्या मृदू रात्री
मोहरलेल्या वृक्षान भोवती
घ्यावेस तू मला मिठीत तुझ्या
विरून जावी माझी सखोल सावली

त्याच कोमल मिठीत तुझ्या
मी पूर्णतः स्वतःस विसरावे
गुलाबी स्पर्शाने तुझ्या मग
अनाहूतपणे तू मला जागे करावे

तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी
पाउल खुणा मागे सारून
रात्र हि ती विरून जावी................


                                                  निर्मला.....

Wednesday, December 16, 2009

तुझ्यात गुंतलेले माझे मन...........

तुझ्यात गुंतलेले माझे मन...........

तुझ्या सोबतचे ते दिवस
खरच खूप सुंदर गेले
गुंतून गेले मन पूर्णतः तुझ्या विश्वात
अजूनही ते तिथेच हरवले

तूझं ते बोलणं, ते मला चीडवन
स्वतःच्या बड-बडीन मध्ये मला नकळत गुंतवणं
अजूनही ते शब्द कानात गुंजत आहे
तू नसतानाही तू असल्याचे भासवत आहे

तूझं ते अल्लड पने वागणं
दोन क्षणा मध्ये हास्य फुलवणं
अजूनही ते तसेंच स्मरणात आहे
तू नसतानाही तू असल्याचे भासवत आहे.........

निर्मला..............

निरोप देताना तुला,

.................
निरोप देताना तुला,
मन कुठेतरी सांगत होत
"थांबव त्याला........................त्याची खूप गरज आहे मला........."
पण अंतर मात्र आपल्यातलं
खूप दूरवर लांबत होतं

तुझ्या नजरेला नजर देताना
हि नजर काहीतरी मागत होती
"तू असावास सोबतीला"
बस हीच एक आस होती

तू दूर दूर जात होतास
पण मन मात्र तुझ्यातच गुंतत होतं
दूरवर असूनही तूझं ते अस्तित्व
मनाला माझ्या स्पर्शल होतं

तुझ्या त्या शेवटच्या नजरेत
मला जे भाव जाणवले
"दुराव्याच्या नैराश्याचे" होते का ते
असे प्रश्न चिन्ह मनी डोकवून गेले

उलगड हे कोडे माझ्या मनीचे,
साद घालिते तुला............
अपूर्णच राहील मी आता....
जर तू नाही वंचीले मला..............

निर्मला...................

Tuesday, December 15, 2009

अधुरी भेट.....

अधुरी भेट.....
तुझी ती पहिलीच ओळख
जरा अपुरीशी वाटली
भेटून तर गेलास तू
पण ती भेट ...........जरा अधुरीशी वाटली.............
कुणाची तरी सोबत हवी असते
आपल्या एकाकी विश्वात या
कुणाची तरी साथ हवी असते.

कितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे
अडखळनार्या पावलांना कितपत स्वताच सावरायचे
जळ फळीत ते उन्हाचे झोके
कितपत एकट्यानेच झेलायचे
आपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला
कितपत केवळ अपेक्षेने स्वप्नात पहायचे
वास्तव कधी त्याचे होईल का ?
स्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे
सत्यात कधी उतरेल का
आशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे
त्या हि संपत चाल्यात आता
पुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे

निर्मला..............